लातूर शहरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर ११ हजार चौरस फूट जागेवर वह्यांच्या सहाय्याने बाबासाहेबांचं भव्यदिव्य असं मोझॅक पोट्रेट साकारण्यात आलं आहे. कलाकार चेतन राऊत आणि विविध क्षेत्रातील १८ लोकांनी एकत्र येत ही कलाकृती साकारली आहे. यासाठी १८ हजार वह्यांचा वापर करण्यात आला असून ते तीन दिवसांत साकारण्यात आलं आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार सुधाकर शृंगारे यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.